डॉ. सुमंत मुरंजन - लेख सूची

सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग …

पुरोहितब्राह्मणांना अनुकूल अशी समाजव्यवस्था

कलियुग म्हणजे मानवी अधःपाताची शेवटची पायरी असा प्रचार करण्यात पुराणांचा हेतु स्पष्टच आहे. पुरोहित ब्राह्मणांना अनुकूल असलेली समाजव्यवस्था सुवर्णयुगाची असे निश्चित झाले म्हणजे त्यात प्रत्यक्षात दिसून येणारी सर्व स्थित्यंतरे कलियुगातील अवनतिसूचक आहेत असे ओघानेच ठरते. विशेषतः जैन, बौद्ध वगैरे पाखंडांनी नवे आचारविचार, नव्या ईर्षा समाजात उत्पन्न केल्या. त्यांचा निराळा निषेध करण्याचे प्रयोजनच उरत नाही. ज्या …

नागवणुकीचे धार्मिक तंत्र

गुलामगिरी, पुरोहितशाही, वसाहती, साम्राज्यशाही व भांडवलशाही हे ऐतिहासिक अनुक्रमाप्रमाणे मानवांनी मानवांच्या केलेल्या नागवणुकीचे चार प्रकार इतिहासास ओळखीचे आहेत. यांत गुलामगिरी व वसाहती साम्राज्यशाही निदान प्रथमावस्थेत तरी पाशवी बळावरच आधारलेल्या असतात. लोकशाही जन्मास येण्याच्यापूर्वीच भांडवलशाही अस्तित्वात आल्याकारणाने, भांडवलशाही व शासनसत्ता या दोघांची प्रेरकशक्ती एकाच वर्गात एकवटली होती असे चित्र कालपरवापर्यंत नजरेस पडत असे. इतरांच्या मानाने पुरोहिती …